नाॅनवेजेटेरीयन रस्सा, कालवण, फिशकरी

 जे लोक मासे व इतर सागरी/गोड्या पाण्यातील मासे खातात त्यांच्या साठी माशांचे प्रकारे त्याचे कालवण  कसे करतात त्याची रेसीपी.

जे कोकणात राहतात त्यांना माश्यांचे खूप प्रकार माहीत असतात. 

प्रथम  मी कोलंबी(झिंग्याचा) अगदी लहान प्रकार   जवळ्याचे कालवण कसे  करतात त्याची रेसीपी लिहीते.

साहित्य:-1)एक मोठी वाटी पांढराशुभ्र ताजा जवळा

2)वाटणाचे साहित्य :-10-15 लसणाच्या पाकळ्या , एक मुठ कोंथीबीर, 2-3 मिरची, एक इंच आल्याचा तुकडा,  सुक/ओल खोबराचा मोठा तुकडा मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून. 

3) मोठ्या लिंबाच्या आकाराची चिंच

4) एक चमचा(टेबल स्पून) हळद, दोन चमचे मसाला

5) मोठा चमचा(पळी/डाव तेल)

6) मीठ.

7) मोठा चमचा(पळी) तेल.

तयारी:-

1] लिंबा इतकी चिंच भिजत घालून पंधरा मिनीटांनी ती  दोन तीन वेळा कोळून घ्यावी .मग त्यातील चोथा (खंर तर तो फायबरचा भाग तुम्ही वाटणात वगैरे वापरू शकता(मी वापरते.) काढून जाडसर पाणी दोन वाट्या तयार ठेवावेत.

2]कालवणासाठी  वाटण:- 10-15 लसणाच्या पाकळ्या , एक मुठ कोंथीबीर, 2-3 मिरची, एक इंच आल्याचा तुकडा,  सुक/ओल खोबराचा मोठा तुकडा मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून.

 3] कृती:-पहिल्यांदा  बारीक जवळा असतो त्यात समुद्रातील काही कचरा माती लहान दगड असतील ते काढून 3-4 पाण्यात धुवून काढायचा नंतर ते एका टोपात घेवून त्यात तेल साधारण एक मोठी पळी, हळद , मसाला दोन चमचे,  चवी नुसार  मीठ, चिंचेचा कोळ आणि तयार केलेल वाटण घालून मस्त उकळी येवून द्यायची. खूपच उकळयची  गरज नाही. पटकन शिजतो. भाताबरोबर रस्सा छान लागतो.

4] हेच पोळी आणि भाकरी बरोबर खायचे असेल तर चिंचेचा जाड रस चटणीसारखा टाकून त्याचं सेम कृतीने अगदी जाडसर रस्सा बनवायचा. खूप छान लागतो. बोली भाषेत त्याला आंबट बोलतात.

5]टीप:- 1)वरील दोन्ही प्रकारात मोठ्या फोडी केलेल्या दोन टोमॅटो/ एक कैरी फोडी करून खूपच छान लागतात.

2) खूप बारीक कोलंबीचा प्रकार असल्याने त्याचे आवरण काढता येत नाही. पण ते हानीकारक  नाही. उलट त्यातून  चांगल्या प्रकारे कॅल्शियम  मिळते. 

3) आधी चिंचेचा कोळून टाकला तर मसाला पाण्यावर तंरगतो. व नीट लागत नाही. व मसाला व जवळा वेगळा राहतो. तेव्हा हळद, तेल ,मसाला टाकल्यावर  जवळा त्यात छान मिसळायचा. / मोठ्या चमच्यात तेल+ हळद + मसाला तिन्ही छान मिसळून मग ते जवळ्यात टाकावे. 


वर्षा पाटील.

उरण रायगड.



टिप्पण्या