जे लोक समुद्रकिनारी राहतात त्यांना शेलफिश ठावूक असेल, त्यात खुबर्या हा एक प्रकार आहे. हा घुमटाकार लहान बोरा एवढा शंख असतो, त्यात मासंलं गोळा असतो व त्याला टणक दारासारखी कपरी असते हा जीव समुद्रातील दगडाला/खडपाला चिकटून असतो, ओहोटीच्या वेळी मासेमारी करणारे लोक गोळा करून आणून विकतात. त्या ला रेती चिखल लागलेले असते, म्हणून घरी आणल्यावर 6-7पण्यात खळखळून/चोळून धुवावे, जेव्हा स्वच्छ पाणी राहील तेव्हा त्या उकडून घ्याव्यात, उकडलेले पाणी वेगळ घ्याव, त्या पाण्याची चव खारट असते. किंचीत माशासारखा वैस वास असतो.
ह्या पाण्याला येलोण म्हणतात. जशीच्या तशी चिंचेच्या कढी सारखी कृती करावी. चव वेगळी रुचकर लागते, हवी असल्यास बोराइतकी चिंच खोळून घालावी. चिंचेची चव येता कामा नये. मीठ घालायची गरज नसते.
वर्षा पाटील. ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा