1)चिंचेच सार/ चिंचेची कढी
ही कढी सुक चिकन, मटन, तळलेली मच्छी (फिश) बटाट्यचा काचरा(चिप्स) बरोबर जेवणात वाढतात.
साहित्य:-
1)२-३ हिरव्या मिरच्या,
2)1/२लहान चमचा हिंग
3)१लहान चमचा हळद
4)२-३लसूण पाकळ्या सोलून ठेचून
5)मोठया लिंबाच्या आकाराएवढी चिंच
6)खोवलेल खोबर,
7)ताजी कोंथीबीर चिरून
8)१लहान कांदा सोलून, धुवून बारीक कापून
9)चवीनूसार मीठ
10)१लहान चमचा राई.
11)1लहान पळी तेल
12)१मोठा पेला(गलास)पणी
13)चवीनूसार साखर (ऐच्छिक )
कृती:थोडयाश्या गरम पाण्यात चिंच 10 मि. भिजत घालून, नंतर एक पेला पाणी घेवून ती पूर्ण खोळून घ्यावी. गॅस वर कढई ठेवून त्यात पळीभर तेल टाकून , तेल तापलं की त्यात राई टाकावी, राई तडतडली की हिंग हळद,व मिरच्या चिरून टाकाव्यात .मग लसूण टाकावा लसूण गरम तेलात सोनेरी झाला की कांदा टाकून तोही सोनेरी होईपर्यंत परतावा, कांदा लसूनाचा वास अतिशय सुंदर येतो. नंतर त्यात, चिंचेचा कोळ(पाणी) टाकावे.मग खोबर, कोंथीबीर, मीठ टाकून एक उकळी आणावी.
कढी दाट नसली तरी अतिशय चवदार लागते. फक्त साधा भाताबरोबर। वाढता येते
ही कढी कच्ची कढी म्हणून सुद्धा करतात. चिंचेच्या कोळात तेल, व मोहरी सोडून सर्व जिन्नस एकत्र करून कुस्करुन टाकावे. व ढवळून तशीच वाढावी. गँस उपलब्ध नसेल तरी तूम्ही करू शकता.
टीप:1)चवीला थोडी आंबटच छान लागते,त्यमूळे पाण्यचे प्रमाण कमी जास्त करू शकता.
2)आवडत असेल तर 1चहचा चमचा साखर घालू शकता तीही छान लागते.
3)लसून कांदा करपू देवू नये चव कडवट होते.
4)तेल अतिशय तापलं असेल तर पाणी टाकताना भांड पेट घेत जपून ओतावे .
5)चिंचेलाच जर मीठ असेल तर मीठाचे प्रमाण त्या नुसार बदलावे नाहीतर कढी खार होईल. मीठाचे प्रमाण अतिशय कमी असेल तर बेचव लागेल.
6)खोबर वाटून न वापरता खोवून वापरावे.
7)गरम पाण्यात चिंच भिजत घातल्याने छान सुटते
8)चिंचेच्य शेडी व चिंचेचा चोथा नीट पाण्यातून काढून टाकावा.
9)दोन दिवस टिकते व खराब होत नाही
10)जड जेवणात मुद्दाम करतात, कारण पचनास मदत करते.
जरूर करून पहा व तूमचा रिप्लाय द्या.
२) अंबोशीची कढी:-अंबोशी साधारण अंदाजे घ्यावी. तीला खूप मीठ असेल तर धुवून स्वच्छ करून गरम पाण्यात भिजत घालावी. की मऊ पडते. मग मिक्सर मधून वाटून पेस्ट करून घ्यावी, जर मऊ पडली नसेल तर एक उकळी आणून थंड करून पेस्ट करावी. व पेस्ट पाण्यात टाकावी. हवं तेवढं दाट पाणी ठेवावं, व सेम टू सेम चिंचेच्या कढी सारखीच करावी.)
3)कवळयाची कढी:-पावसाळ्यात अनेक पालेभाज्या डोंगरावर उगवतात,त्या वर्षातून एकदाच उगवतात, आणि लागवडीसाठी त्याचे बी मिळत नाही. त्या वनस्पती डोंगरात राहणारे आदिवासी विकायला आणतात, त्या औषधी असतात त्याच बरोबर त्यात बरेच क्षार, जीवनसत्व असतात. अशाच वनस्पती पैकी काळा नावाची पान वनस्पती मिळते. ती चींचेच्या पानासारखी किंवा लाजाळूच्या पानासारखी झुडूप वर्गीय असते. श्रावण महिन्यात दर शनिवारी /सोमवारी हमखास ही भाजी/किंवा कढी करतात.ही उपवासाची कढी आहे.
भाजी स्वच्छ धुवून प्रत्येक काडीवरची नाजूक कवळी छोटी पाने वाटीभर घ्यावीत. उपवासाला कांदा, लसूण खात नाहीत, व पाने लहान असल्यामुळे कोंथीबीरीची/कडीपत्याची गरज नसते.पण खोबर्याबरोबर वाटून घालायला हरकत नाही. चिंचेचा कोळ घट्टच घालावा. प्रथम कढईत तेल तापवून, तेलावर जीर,राई मिरची टाकवी कवळ्पाची पाने घालून परतावीत,झाकण देवून वाफेवर शिजवावीत, मग हिंग हळद, चिंचेचा कोळ व खोबरे टाकून चांगली उकळी आणावी. चवीनुसार मीठ घालावे. भाताची खिचडी, किंवा साध्या भाताबरोबर वाढावी.
वर्षा पाटील. ©️®️🌹
समाप्त.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा