पहिला पाऊस पडला की अनेक वनस्पती उमलून वर येतात त्या पेराव्या लागत नाहीत,त्यात अनेक औषधी गुणधर्म असतात. व ते वर्षातून एकदाच मिळतात. म्हणून आवश्यक खाव्यात. शेवळ ही अशीच रानातील भाजी आहे.शेवळ कोवळी बंद मिटलेले असतानाच खावी. त्यांना खाज असते, व उमललेली शेवळाची खाज वाढते. फार फार जून महिन्यात पहिला पाऊस पडल्यावर 15-एखादं महिना ही भाजी मिळते ही आमटी ही शहाकारी आणि मासांहारी पध्दतीने करतात. शेवट विकत घेताना त्याच (आदिवासी )बाईकडे काकडं हे सेम आवळयाचं अकाराच फळ मागून घ्याल जर नसेल तर वाक्यावर आजूबाजूला विकत मिळत का पहावं साहित्य भरपूर असल्याने चविष्ट तर लागतेच पण खाज मोडते.
साहित्य:
1) दोन जुड्या शेवळ
2)10-15 काकड हे फळ स्वच्छ धुवून
3)1 वाटी शेंगदाणे
4)1वाटी सोललेली कोलंबी/कंरदी/सुकट/मटण/चिकनचा खिम्मा
5)नारळची अर्धी कवड खोवून
6)1 वाटी काजूगर(ऐच्छीक)1/2 तास पाण्यात भिजवून कोवळ्या काजूबिया कापून गर घेतले तर अधिक रुचकर लागतात.
7)5-6 मोठे कांदे धुवून सोलून जाडसर चिरून
)दोन अंडी
9)1वाटी भाजणीचे /चण्याच/भाकरीच(अगदीच नसेल तर)पीठ,
10)प्रयेकी 1 टी स्पून हिंग,राई(नसली तरी चालते), जीर,हळद
11)3-4 चमचे मसाला(कितपत तिखट आहे त्यावर कमी जास्त घ्याव)
12) 1/2 वाटी आल, लसूण पेस्ट(जर खिम्मा असेल तर त्याला चोळून ,1चमचा वगळून )
13) 2मिरच्य ,कोंथीबीर, 1 छोटा भाजलेला कांदा (उरलेली 1/2 वाटी खोबरे) ह्वाच वाटण
14)दोन लिंबा इतकी चिंचेचा कोळ
15) चवी नुसार मीठ
16)1वाटी तेल
17)दोन टोमॅटो ऐच्छिक
कृती:-1) शेवळ साफ करताना हाताला आधीच खोबरेल तेल लावावे की खाज येत नाही. वरील चाँकलेटी आवरण काढून आतील कोवळा पिवळसर, टिपके असलेला भाग गोल गोल चकत्या करून बारीक कापावा.
2)काकडंं वयवंट्यांने ठेचून आतील बिया काढून टाकाव्यात व जाडसर ठेवावेत.
3) शेंगदाणे भिजत घालून वंरवंट्याने ठेचून घ्यवेत.
4) पिठ पाण्यात सरबरीत,पातळ भिजवून घ्यावे.
5)हया आमटीसाठी मोठ अॅल्युमिनियम चं पातेलं घेवून त्यात 1वाटी तेल तापत ठेवांव, हिंग, हळद जीर राई, फोडणीत घालावी कांदा व शेवळ कांद्याबरोबर शिजत ठेवावीत कांदा पूर्ण शिजला की त्यात तत्सम जो मिच्छीचा प्रकार घेतलेला आहे तो घालावा, 1 चमचा आल-लसून पेस्ट, 3-4 चमचा मसाला 1 वाटी काकडं, 1 पेला पाणी घालून जाड झाकणावर पाणी ठेवून शिजत ठेवावं, खिम्मा किंवा कोलंबी बरोबर काकड शिजली पाहीजेत. साधारण 10 मिनिटांनी, शेंगदाणे, काजू, भिजवलेले पीठ ,खोबरे , टाकून परत झाकणातील गरम पाणी टाकून परत पीठा बरोबर सर्व जिन्नस शिजले पाहीजेत.
6) नंतर शेवळ पूर्ण बोटाने शिजले की नाही ते पाहून शिजल्यावर च टोमँटो,वाटण चिंचेचा कोळ टाकून 1ग्लास पाणी टाकून परत 5 मिनट शिजवून, त्यात गरम मसाला ,दोन अंडी फोडून, फेटून, मीठ, चवीनुसार घालून अंड शिजल्यावर हवं तेवढं जास्तीच पाणी घालुन 10 मिनिटं उकळवावे, पाण्याच प्रमाण हे पीठाने आमटी किती जाडसर होते, त्यानुसार कमी जास्त करावे.
7 )कोथिंबीर, कडीपत्ता हवा असल्यास घालावा, त्याने वास छान जातो.
8)आमटी भाकरी ,फुलके, चपाती बरोबर खाता आली पाहीजे इतपत जाडसर हवी.
9)काकडाने खाज मोडते, त्यामुळे ती हवीत, नाहीतर चुका म्हणून पालेभाजी मिळते ती आंबट असते ती शेंवळाबरोबर धुवून बारीक कापून कांद्यावर परतावी.
10)गरम गरम खाल्यास तोंडात खवखवते, पण वरील पघ्दतीने केल्यास खवखवत नाही. जर तसंच जाणवलं तर 1 लिंबू पिळून थंड सर्व करावी, थंड खाल्यास खवखवत नाही.
11)वरून 1पळी साजूक तुप सोडावे, छान लागते.
12)शहाकारी पध्दतीने करायची असल्यास वैस काढुन त्यात आळूच्या छोट्या कांदर्या धुवून पिलरने सोलून कांदयाबरोबरच . तुकडे करून टाकावीत.
13) काकडं पूर्ण शिजायला हवीत नाहीतर चांगली लागत नाहीत, व शिजताना त्यातील रस आमटीत मुरतो व शेवळ खवखवत नाहीत. रस मुरल्यामुळे आमटी चविष्ट बनते.
चिंच ,टोमॅटो ,खोबरे, हे शेवळ, शिजल्या शिवाय टाकू नयेत घाईघाईत टाकल्यास शेवळ, काकडं दोन्ही शिजत नाही. न शिजलेली शेवळ कलकत्ता.
वर्षा पाटील .©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा