राजगिरा लाह्यांचा चिवडा

उपवसासाठी राजगिर्याचा लाडु /चिकी आवडत नसेल तेव्हा राजगिर्याचा चिवडा छान आप्शन आहे. हल्का आणि तरीही पोटभरणारा पोष्टिक लहान मुलांनसाठी छान ऑप्शन आहे.राजगिर्याच्या लाह्या अतिशय लहान आणि हलक्या असतात.त्या जड साहित्यात नीट मिक्स  होत नाहीत.तेव्हा लाह्या साठी सर्व साहित्य लहान अकाराचे घ्यावे.
साहित्य:-1)लहान वाटी काजू तुकडा
सर्व साहित्यासाठी एकच प्रमाण ठेवावे.
2)1वाटी बदाम तुकडा
3)1वाटी लहान आकाराचे मखाने
4)प्रत्येकी 1/2वाटी पिवळ्या व काळर्या मनूका.
5)प्रत्येकी 1/2वाटी डाळब्या,शेंगदाणे ,सूर्य फूल बीज, पमकीन बीज,मगज
6)10-12हिरव्या मिरच्या
7) 1वाटी कोंथीबीर चिरून
8)15-20कडीपत्ता पाने.
9)हिंग,हळद,मीठ चवीनूसार
10)चवीनूसार पीठी साखर
11)पाव किलो लाह्या.
12)पाव वाटी साजूक तूप
कृती:- गँस वर 5-6 चमचे तुपात सर्व 
वरील सर्व ड्राय फ्रुट एक एक करून भाजून एका परातीत काढून घ्या.
नंतर मनाने छान क्रिस्टी करून घ्या.
मग 3-4चमचे तूपात छान नरम पणा जावून फूले पर्यत लाह्या भाजून घ्या.
कढईत उरलेल तूप कढवून त्यात मिरच्या बारीक चिरून टाका, त्या शिजल्या की कडीपत्ता छान कुरकुरीत करून घ्या,1वाटी कोंथीबीर टाका तीही  चांगली शीजली पाहीजे त्यातील पाण्याचा अंश निघून गेला पाहीजे. मग 1चमचा बडीशोप,  हळद,मीठ टाकून सर्व लाह्यांसकट  मिक्स केलेल्या जिन्नसात टाका.वरून पीठी साखर पेरा.
हलक्या हाताने छान मिक्स करा.
राजगिर्याचा चिवडा तयार.
चविष्ट लागतो आवडीनूसार वरील जिन्नस कमी जास्त केले तरी चालतात.
समाप्त.
वर्षा पाटील.

टिप्पण्या