दिवाळीत आपण खूप सारे पदार्थ बनवतो, त्यात थोडीसी वेगळी मिठाई बनवण्यासाठी सोया पनीरची रेसीपी,
पाव किलो सोयाबीन बीज स्वच्छ धुवून २४ तास भिजत घालून नंतर ते उपसून भिजत घातलेल सोयाबीनचे दाणेचे छान मिक्सर मध्ये अगदी फाईन पेस्ट करून त्यात ते गाळण्या इतपत पाणी घालून ती पेस्ट गाळून घ्यावी. ती पेस्ट इतकी फाईन वाटली गेली पाहिजे , की त्यात जास्तीचा चोथा उरता कामा नये.नंतर ते दूध पूर्ण गाळून घ्यावे.(जो चोथा राहतो,तो उन्हात वाळवला की त्यांचे सोया वडी/सोया चंक्स तयार होतात.) सोयादूधाच्या मापापेक्षा मोठ्या भांड्यात ते गॅसवर उकळत ठेवावे.सोयादूधाला उकळी आल्यावर (ते ऊतू जावू देवू नये.) त्यात थोडं थोडं करून व्हिनेगर टाकून दूध फोडून घ्यावं, दूध फाटलं की व्हिनेगर टाकणं थांबवावं नाहीतर पनीरला आंबटसर चव येईल. दूध थंड करून फाटलेल दूध पाढंर्या मलमलच्या कापडाने गाळून घ्यावं.(ऱगीत कपडा वापरला तर त्या कपड्याचा ऱग पनीरला लागून पनीर खराब होते.)
(गाळलेले दूधाचं पानी स्टाॅक म्हणून भाजीत वापराव़). निथळून काढलेलं पनीर मधल पाणी निपटून काढण्यासाठी ते कापडात घट्ट बांधून त्यावर जड वस्तू ठेवून पुर्ण पाणी निघून गेल्यावर ते दोन तासांसाठी फ्रिजर मध्ये तसंच ठेवावं.(त्याने ओलसरपणा राहून पनीरला घट्ट पणा येतो)त्या ऩंतर ते पनीर स्वच्छ दोन तीन वेळा हलक्या हाताने अलगद थूवून काढावे.त्याने त्यांची कडवट आंबटसर चव निघून जाते.
तयार झालेले. पनीर बर्फी साठी तयार झालेल़ आहे.
हे पनीर तूम्ही वेगन पनीर म्हणून बर्फी साठी सूद्दा वापरू शकता.
हे भाजी साठी तयार झालेलं उत्तम पनीर आहे.त्याच्या छान चौकोनी तुकडे पडतात.
वर्षा प्रभाकर पाटील.
©®
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा