200 ग्रॅम मखाने कढईत रोस्ट(भाजताना)करताना त्यात चाट मसाला, सैंधव नमक चिमुटभर,पावभजी मसाला टाकून प्रतेक वेळी मुठभर मखाने थोडस साजूक तूप टाकून रोस्ट करावेत.ते दोन बोटात दबून /टेस्टला क्रचीं झाले पाहीजेत.
सर्व सामान मोजताना एकच वाटी ठेवावी.
2)एक वाटी शेंगदाणे भाजून,
3)एक वाटी काजू,
4)एक वाटी बदाम,
5)अर्धी वाटी डाळब्या,
6)अर्धी वाटी पिस्ता
7)प्रत्येकी एक वाटी काळया मनुका,अखरोट तूकडे
8)मीठ
9)चाट मसाला/पाव भाजी मसाला,एक,एक चमचा
10)2 चमचे पीठी साखर,
11)अर्धी वाटी साजूक तुप
12)7-8 मिरच्या, तुकडे करून
13)मुठभर कडीपता
14)एक चमचा सैधव नमक
कृती:- एका कढईत तुप गरम करून फोडणी करून त्यात काजू, बदाम ,मनुका,अखरोट,पिस्ता,शेंगदाणे, डळब्या. व ते सर्व तुपात मिरयांचे तुकडे टाकून वर कडीपता टाकून फोडणी करवी.फोडणीत मीठ टकावे.ऐच्छीक हळद,व मिरची पूड टाकवी.सर्व फोडणी भजलेल्या मखानेवर ओतावी गरम असतानाच पीठी साखर टाकावी.
थंड झाल्यावर डब्यात भरावा.
टीप:- 1) हा मखाना चिवडा नवरात्री उपवासाला करतात.
पौष्टीक असतो.
2)वजन कमी करण्यासाठी उत्तम
3)डयबिटीज मध्ये साखर वगळून चिवडा करावा.रक्तातील साखर कमी होते.
वर्षा पाटील.©®🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा