13) गाठ्ठयांची आमटी



साहित्य:-1)एक वाटी बेसन

2)प्रत्येकी  एक चहचाह चमचा ओवा,मसाला,हिंग,मीर,

1/2चमचा हळद,चवी प्रमणे मीठ

3)एक वाटी कोमट पाणी़

कृती:-एक वाटी बेसन पीठ घेवून त्यात एक चमचा ओवा हातावर चुरून ,एक चमचा मीर कुटून, हिंग, हळद, मसाला, मीठ,टाकून घट्टसर पीठ मळून घ्याव. 10मीनटं झाकून ठेवून परत एकदा खूप मळून घ्याव.त्याची  गोल (लढी)वाटोळ बनवून सुरीने गोल गोल पेढे बनवावेत व मोदक पात्रत उकडवून घ्यावेत किंवा ते पीठ  उलट्या थाळीला तेल लावून त्यावर पीठ थापून चौकोनी वडया कापाव्यात

आमटीचे साहित्य:-1) एक कांदा बरीक कापून

2)कडीपत्ता,कोथींबीर,आल लसून पेस्ट एक चमचा ,

3)कांदा लसून मसाला एक मोठा चमचा 

4)हिंग-1/4चमचा

5)हळद-1/2चमचा

प्रत्येकी राई,जीर,1/2 चमचा

6)मसाला-1 चमचा

7)मीठ चवीनूसार

8)गरम मसाला 1/2चमचा

9)  एक छोटा कांदाभाजून+ ओल खोबरं वाटून आर्धी वाटी

(कांदा लसून मसाला असेल तर नुसतं खोबरं वाटून चलेल. )

10)दोन पळी स्वयपाकघरातील   तेल

11)एक चमचा आमचूर पावडर

कॄती:-कढई तापत ठेवून त्यात राई जीर,हिंग हळद मसाला कांदा,टाकून परतवून घ्यावें नंतर  त्यात आल लसून पेस्ट टाकून एकत्र करा,कांदा लसून मसाला टाकून छान परतवून घ्या. सर्व मसाला शिजवतना करपू नये म्हणून त्यात आर्धी वाटी पाणी टाका. व परत पाणी थोड आटलं की त्यात कांदा खोबरं वाटण, आमचूर पावडर मीठ, गरम मसाला टाका. व परत तेल सुटे पर्यत परतवा परत त्या ग्रेव्हीत हवं तेवढं पाणी(कोमट) टाकून, वड्या सोडा हवं असल्यास थोड गुळ टाका. व वड्या चांगल्या शिजे पर्यत मध्यम आचेवर रस्सा शिजवा ओल खोवलेल खोबर, व कोथींबीर टाका. छान उकळी देवून गॅस बंद करा. 

टीप:- 1) कांदा लसूण वाटणाने आमटीला छान रंग येतो. 

2) प्रत्येक वेळी पाणी टाकताना कोमट पाण्याचा वापर करा. 

3) आमचूर पावडर ऐवजी टोमॅटो केचप किंवा एका टोमॅटोच्या फोडी वापरल्या तरी चालेल पण प्रमाण जास्त नको. 

4) एक चमचा बेसन पीठ ची पेस्ट करून आमटीला लावली तरी चालेल. आमटीला किती घट्ट, सैल हवी त्यावर अवलंबून आहे. 


टिप्पण्या