आळूवडी साठी लागणरी पान आपण जेव्हा विकत आणतो, तेव्हा त्याबरोबर आपल्याला त्याची देठ मिळतात,ती आपण सहसा न वापरता फेकून देतो,त्यची आमटी बनवतात तीला आळूच फतफत म्हणतात.
साहित्य:-
1)एका आळूच्या जुडीची देठं धुवन बारीक गोल गोल कापून(जास्त टाकली तरी चालतात. पण मग चिंच थोडी जास्त घ्यावी. )
2)एक मोठा कांदा चिरून
3)लिंबा एवढी चिंच खोळून
4)एक छोटा कांदा भाजून/थोडयाशा तेलात तळून
5)एक चौथाई( कवड )सुक खोबर
कांदा व खोबर बारीक वाटून
6)आल,लसून,मिरची कोंथीबीर वाटून
7)लिंबाएवढा गुळ
8)कडीपत्याची पानं
9)प्रत्येकी एक चमचा जीर,राई,ओवा,हिंग,हळद,गरम मसाला(दोन छोटे चमचे लाल तिखट)
10)एक पळी तेल,
11)एक छोटी वाटी बेसन
12)एक टाळ(एका मुळात जितकी पानं येतील तेवढी। पान)साधारण छोटी पाव वाटी
13)एक चमचा साजूक तूप
14)एक आळूचं पान बारीक चिरुन
15) धणेजीर पुड एक चमचा.
कृती:-
एका कढईत एक पळी तेल टाकून तेल तापलं की त्यात हिंग, राई ,जीर,कडीपता,टाकून त्यात कांदा तळावा,आल लसून चं वाटण टाकाव. त्याचबरोबर कपलेल अळूच पान आणि,कापलेली देठ टाकून गुलबी रंग येईपर्यत परतायचं मग वर झाकण ठेवून वाफ आणायची, वाफेवर पान व देठ शिजल की हळद, तिखट, धणेजीरे पूड टाकावी. बेसन मध्ये पाणी टाकून सैलसर भिजवलेल पीठ टाकून आणखी एक दीड वाटी पाणी टाकून मस्त रटरटू द्याव. नंतर भिजवलेला चिंचेचा कोळ, गुळ, टाकाव. मीठ, कांदा खोबर वाटण टाकावं,वाटणं शिजेपर्यत परत झाकण द्याव. खूपच जाडसर वाटत असेल तर आणखी वाटीभर पाणी टाकून उकळी काढावी. कोंथीबीर व साजुक तुप टाकाव.
टीप:-1) हे फतफत आंबटगोड चवीच असावं कारण आळू जीभेला खाजतं चिंचेमुळे खाज मोडते.
2) आळू काळ्या देठाचे असावे. व पानाच्या शीराही काळ्या असाव्यात.
(पांढर्या देठाचे आळू नसून तशाच प्रकारची तेरी नावाची वनस्पती असते.)
3) भात, भाकरी, सोबत छान लागत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा