आंबट भेंड्यासाठी गावठी सहातारी(बाजूला शिरा असलेले) मोठे पण कोवळे भेंडे वापरतात. हे साधारण गौरीच्या नैवद्यासाठी वापरतात( ह्या साठी आधीच गोळे बनवताना वेगळी चिंच काढून ठेवतात.कही ठिकाणी गौरीला चिंबोरी वैगेरे वैस खातात,म्हणुन चिंच खातात)
साहित्य:-१)4-5 सहातारी भेंडें
२) 1 मोठा कांदा जाडसर कापून
३)1 चमचा हळद
४)1 चमचा जिर
५) 1 चमचा राई
६)1/4 चमचा हिंग
७) 1 चमचा आल लसुण पेस्ट
८) 1 चमचा मसाला
९) 1 मोठा चमचा (1/2 कांदा भाजूध व मोठा। तुकडा सुख खोबर 1-2 सूख़या मिरच्या वाटण) १०)१चमचा साखर
11)चवी नुसार मीठ
12)1 चमचा कोंथीबर
13) 1वाटी चिंचेचा कोळ
14)1 पळी तेल
कृती:-प्रथम कढईत तेल तापवून त्यात हिंग मोहरी जिरे, कडीपत्ता, आल लसुण पेस्ट कांदा टाकून परतावे, हळद मसाला भेंड्याचे मोठे तुकडे टाकून झाकणात पाणी ठेवून चांगली वाफ आणावी, कोवळा भेंडा लगेच शिजतो, मग झाकणातील उकळलेले पाणी ,वाटण, चिंचेचा कोळ, मीठ साखर कोंथीबीर टाकावे, चांगले 10 मी उकळवावे. रस दाट झाला पाहिजे. रस आंबट गोड तिखट तिन्ही चवी उतरल्या पाहीजेत.
टीप:-1)भेंडे कोवळे पाहीजेत.जून असले तर शिजत नाहीत शेडी लागतात.
2)कंकोथीबीरने रस पातळ होतो त्यासाठी धणेपूड वापरली तर उत्तम.
वर्षा प्र पाटील. ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा