माचोळ ही समुद्र किनारी मिळणारी झुडूप वर्गीय वनस्पती आहे. ती खारफुटी जमीनीत(खाजणात) म्हणजेच जिथे समुद्राच भरतीच पाणी ओसरत तिथे उगवते. साधारण 4-6 इंच लांब व गडद हिरव्या रंगाची एकाच देठला छोटी पान(देठ च एक छोट पान असतं) एकमेकांना जोडल्यासारखी दिसणारी चिखलात वाढणारी वनस्पती आहे. खूप क्वचित आढळते. तिची आमटी साधारण मासांहारी पध्दतीने करतात, क्वचित शाकाहारी पध्दतीने करतात.
साहित्य:-
1)दोन जुडी माचोळची भाजी(चिखल व रेती असल्याने ५-६ पाण्यात स्वच्छ धुवून उकडून थंड करून घ्यावी मग जाड शेड सदृश्य देठ काढून कोवळी पान काढून घ्यावीत. )
२)एक वाटी सोलून साफ केलेली धुवून कोलंबी/करंदी/सुकट(मच्छीचा प्रकार)/दोन अंडी
३)दोन कांदे उभे चिरून
४)अर्धा कांदा भाजून /तळून वाटणासाठी.
५) आल, लसूण, मिरची कोंथीबीर, कांदा खबर वाटण
६)प्रत्येकी एक छोटा चमचा, हिंग, हळद, गरम मसाला, धणेजिरे पुड,
७)1/2 वाटी तेल
८)एक मोठा चमचा प्रत्येकी भाजणीचे व चण्याचे पीठ, /
२मोठे चमचे चण्याचे पीठ
9)लिंबा एवढी चिंचेचा कोळ करुन
१०)एक टेबल स्पून मसाला
११)1 छोटा चमचा प्रत्येकी राई/जिर
१२) चवीनुसार मीठ
१३)दोन अंडी(ऐच्छीक)
कृती:-कढ ईत तेल तापत ठेवून हिंग, राई, जिर, टाकून फोडणी करावी, मग त्यात कांदा परतून त्यातच कोलंबी टाकावी व वाफेवर 5 मिनिटं शिजवाव,मग त्यात हळद, मसाला, माचोळची भाजी, टाकून, 5 मिनट परतावा, मग दोन्ही पिठ भिजवून 1 पेला पाणी ओतून पीठ शिजू द्या, आमटी घट्ट झाल्यास जास्तीच पाणी टाकावे, आमटी खाली लागु देवु नये नाहीतर क़रपेल, पीठ शिजले की चिंच गरम मसाला, व वाटण टाकवं दोन अंडी फोडून टाकावीत(ऐच्छीक)अधिकच १पेला पाणी टाकून,चवीनुसर मीठ टाकावं, व चांगली 10 मिनिटं उकळी आणावी सर्व जिन्नस एकजीव झाले पाहिजेत. उतरताना १चमचा कोंथीबीर टाकावी.
टीप:1)चिचेत मीठ असतं, तसचं माचोळच्या भाजीत मीठ असतं तेव्हा मिठाचे प्रमाण जपून टाकावं.
2) शहाकारी पध्दतीने करायची असल्यास 1वाटी ताज्या भूशेंगा सोलून त्याचे दाणे/शंगदाणे भिजत घालून, मच्छी ऐवजी टाकून अंड वगळावे. बाकी कृती तशीच
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा