7 कांदे बटाटा रस्सा

 कांदे बटाटा रस्सा हा मटण चिकन असतानाकरतत,लग्नाघरी मांडिला करतात, अशा वेळी साखर घालत नाहीत. 

ज्यांना  वरण आवडत नाही ते उपवासाला  देखील करतात. 

झणझणीत/गोडसर दोन्ही छान लागतात. 

साहित्य:-

1)4 कांदे

2)4 बटाटे

3) 1 छोटा चमचा राई

4) 1 छोटा चमचा जीर

5)1-2मिरच्या

6)1-2 लसूण पाकळ्या 

7)1 मोठा चमचा कोंथीबीर 

8)1चमचा आल लसुण पेस्ट

9)1 चमचा साखर

10)1 चमचा हळद 

11)1 चमचा मसाला

12)चवीनुसार मीठ

13)1/4 चमचा हिंग 

14)2 पळ्या तेल/साजूक तूप

15)1मोठा चमचा खोबर

16)कडीपता5-6 पानं

17)1/2 चमचा कांदा लसूण मसाला

18)1/2 चमचा गोडा मसाला

कृती:-कांदा व बटाटा दोन्हींच्या धुवून सोलून कापून अर्ध्या ( कांदा  व बटाट्याचा) मोठ्या फोडी करून  घ्यावेत.कढईत तेल तापवून  त्यात (ठेवलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकून सोनेरी रंग येवू द्यावा) हिंग राई,  जीर ह्याची फोडणी करून  मग त्यात  कडिपत्ता आलं, लसुण पेस्ट टाकावी कांदा थोडा वेळ परतावा मग बटाट्याच्या फोडी टाकून  त्यात हळद,  साधा मसाला ,कांदा लसूण मसाला,टाकून  चांगले मिक्स करावे. मग त्यात 1 मोठा पेला पाणी  टाकावे, झाकण देवून चांगले शिजू द्यावे. झाकणात पाणी ठेवावे, बटाटे शिजले की त्याबरोबर कांदाही शिजतो.झकणतील पाणी उकळलेले असते ते कढईत टाकावे, खोबरे, मीठ, साखर, 1/2 चमचा गोडा मसाला, कोथिंबीर व दोन अख्ख्या मिरच्या टाकाव्यत.चंगल उकळी आणावी, रस्सा दाटसर  चांगला  लागतो, कांद्यामुळे दाट होतो.खोबरे वाटून जास्त चांगले लागते .

तेला ऐवजी साजूक तूप वापरले तर जास्त चविष्ट  होतो. 

टिप्पण्या