5 गोड वरण/डाळ

 साहित्य:-

1)मसूर डाळ/मुग डाळ/तूर डाळ

2)साजूक तुप/तेल

3)मीठ

4)जीर

5)हिंग

6)हळद

कृती:-वरील पैकी तिन्ही पैकी 1 वाटी,डाळ /तिन्ही डाळी एकत्र  करून 1वाटी डाळ,  धुवून  1/2 तास(मुग/मसूर डाळ)2तास तूर डाळ भिजत घालून नंतर त्यात हिंग, हळद, मीठ, तेल, टाकून  4 वाटी पाणी टाकून  कुकरला लावून 4शिट्या देवून  शिजवावे. कुकर थंड झाला की शिजलेली डाळ एकजीव होण्यासाठी रवीने/ब्लेडंर ने  मोडून परत एक उकळी  आणावी  पाणी जास्त झाले असेल व डाळ मोडून ही एकजीव होत नसेल तर पाणी आठवावे, किंवा काढून ठेवावे.  वरण उकळत्या त्यात 4 चमचे साजूक तूप टाकावे. काहींना गॅसवर वेगळ्या कढईत तूप गरम करून त्यात जिर्यची फोडणी करुन वरील वरणात घालून फोडणीचे वरण ही आवडते. काही दोन लाल सुक्या मिरच्याही फोडणीत टाकतात. पण नैवद्याला हळद, हिंग, मीठ, साजूक तूप घालूनच  वरण करतात.  नुसता वरण, भात आणि साजूक तुप छान चविष्ट लागते. 

१)मुग डाळ पौष्टीक व पचनास हलकी असते. लगेच शिजते. 

२)तूर डाळ जास्त चवदार असते, पण पितं वाढवते. 

३)मिश्र डाळीचे वरणही चविष्ट  लागते. 

४)साधे वनस्पती तूप , साजूक तूपाऐवजी टाकले तरी चालते, 

५)मीठाचे प्रमाण योग्यच हवे, नाहीतर भातावर वरण बेचव लागते. 

६) जास्तीचे वरण शिजल्याचे काढलेले पाणी भाज्यात,सूपात वापरतात. 

७)त्या पाण्याला मुगाच्या डाळीचे  कढण म्हणतात. व ते आजारी माणसाला पिण्यास देतात. 


टिप्पण्या