प्रस्तावना

 नमस्कार मित्र मैत्रिणींनो, मी आपल्या  साठी मराठमोळ्या रेसीपी ब्लाँगवर घेवून आले आहे.या रेसीपी नविन नाहीत, कदाचित यात एकसारखे पाही आसेल परंतू त्यांची चव मात्र नक्कीच वेगळ्या व रुचकर आहेत. पिझ्झा  बर्गर,  ह्या नंतर लोकांना अगदी मराठमोळी कांदा, भाकर,मीठ चढणीची चव अधिक चविष्ट लागू लागली त्याचे  कारण माणसाला तेच तेच खायला आवडत नाही, म्हणूनच  अनेक प्रकारच्या  रेसीपी मी तूम्हाला इथे लिहीणार आहे. सुरूवातीला आपण भातावर जे काही सार घेतो त्याचे प्रकार पाहूयात नवशिक्या मुली, ज्या शिक्षण घेताना ग्रुपने राहतात, किंवा नविन विवाहीत मुली शिक्षण संपल की नोकरी करता करता काही जेवण शिकणाच्या आत लग्न होतात आणि अचानक जेवण करायची वेळ येते, युट्यूब वर तर खुप विडिओ असतात पण पाहुन काही   किंवा अचानक मराठी  मुलाशी परप्रांतीय  मुलीच लग्न होतं आणि तुला  येणारी रेसीपी कर सांगितलं तर काहीच येत नसतं अशांसाठी किंवा तरूण मुल नोकरी साठी जातात घरच्या जेवणाची खूप आठवण येते, पण करायला काही येत नाही, अशा मुलांसाठी ह्या साध्या  सोप्या रेसीपी.

  साधा भात सर्वानाच येतो. (भाताच्या प्रकारात तो येईलच)असं  गृहीत धरून मी त्याला चव यावी ,ओलसरपणा यावा ह्यासाठी  त्या भातावर जे आपण सार घेतो त्याचे साधे प्रकार  पहाणार आहोत.  नक्की करून पहा. लाइक शेअर करायला विसरू  नका. 

सार/ कढी/आमटी/वरण,डाळ, इ.

1)चिंचेचे  सार

2)टोमँटोचे सार

3)अंबोशीचे सार

4)कैरीचे सार

5)ताकाची कढी

6)कोकमाची कढी

7)येलोण्याची कढी

टीप:-ब्लाॅगवर लिहिताना एक खास असा, ब्लॉग चा गुण आहे तो हा की त्यांच्यात, लेखकाला काही चुक आढळल्यास,  ती चुक तो केव्हाही दुरूस्त करता येते. पंरतु ब्लॉग वाचणारे बरेच कष्ट करून साॅफ्टवेअर शिकलेली लोक , लाॅक काढून स्वता त्या लिखाणात अशुद्ध ,चुकीचं, काही बाही लिहितात, रेसीपी स्वताला घेण्यासाठी डिलीट करतात,  त्यांचे क्रम चुकवतात. तर कृपया असं करू नका. काही महाभाग मीच वर्षा पाटील आहे, आणि ब्लॉग माझा असून मीच लिहीते, करून सर्व लिखाण स्वताचे आहे करतात, म्हणून दररोज प्रसिद्ध होणार माझं लिखाण मी थांबवले होतं, ते मला पून्हा सुरू करायचे (प्रसिद्ध) आहे.

धन्यवाद

वर्षा पाटील.©®

टिप्पण्या