आंबट वरणासाठी /सांबर साठी सुद्धा तूरडाळ, मुगडाळ, मसूरडाळ वापरतात. मिश्र डाळीचे sambhar जास्त चविष्ट लागते.
साहित्य:-
1)डाळ १)1वाटी वरीलपैकी कोणतीही डाळ, /मिश्र डाळ, 2 तास धुवून भिजत घालून कुकरमध्ये 4-6 शिट्या देवून शिजवून.
2)राई 1चमचा
3) जीर 1चमचा
4)हिंग 1/4 चमचा
5) हळद 1 चमचा
6)5-6 हिरव्या मिरच्या,5-6,लाल सुक्या मिरच्या
7)5-6पाने कडिपत्ता
8)तेल 2 पळया
9)1 कांदा
10)1 बटाटा
11)1 वांग
12)1 चमचा आलं लसून पेस्ट
13)1 चमचा ओलं खोबरं
14)1 चमचा धने पावडर
15)1 चमचा कोंथीबीर कापून
16)1 छोट्या लिंबा एवढी चिंच(भिजवुन शेडी काढून)/ आमसूल/ अंबोशी
17)1 मोठ्या लिंबा एवढा गुळ
18)1 चमचा गरम मसाला/सांबर मसाला
19)1 टोमॅटो धुवून, कापून, फोडी करून
20)5-6 शेंगा श्रावण घेवडा
21)1 शेवग्याची शेंग
22)मीठ चवीनुसार
23)2-3 ल,सून पाकळ्या सोलून
24)1/2 साधा मसाला/मिरची पूड
कृती:-कढईत 1पळी तेल तापत ठेवून त्यात ,मोहरी जिरे तडतडू द्या, नंतर त्यात आल लसुण पेस्ट, मिरच्या, व त्या बरोबर 1/2 चमचा हळद टाका,1/2 चमचा साधामसला व कांदा टाका, कांदा परतल्यावर त्यात बटाटा , वांग, श्रावण घेवडा, शेंग, टाकून अर्धा वाटी पाणी टाकून त्यावर झाकण ठेवून झाकणात 1/2 वाटी पाणी ठेवून चांगली वाफ येवून द्यावी ,शेंग शिजली की त्यात झाकणातील पाणी, शिजवलेली डाळ, व टोमॅटो टाकून ढवळावे मग (चिंचेचा कोळ), अंबोशी/कोकम टाकावे. ओल खोबरं घालून, मग, गुळ, टाकावा. सांबार मसाला/गरम मसाला, धने पावडर टाकवी, व चांगले उकळावे, कोंथीबीर टाकावी मीठ टाकून गँस मंद करावा. बाजूला फोडणीच्या कढईत 1पळी तेल तापवून त्यात लसनाच्या, पाकळ्या ठेचुन हिंग 1/2 चमचा ,हळद, कडीपत्ता,सुक्या मिरच्यांची फोडणी करून ती वरणात ओतावे, (तडका द्यावा). चांगली ढवळून घ्यावी छान वास येतो.
टिप :1)-भाज्यात 1 धुवून, सोलून तुकडे करून गाजर,5-6 तोंडली,फलाँवर,चे तुरे टाकू शकता,
2) आणखी तिखट हवा असेल तर
1/2चमचा मिरची पुड /साधा मसाला टाकू शकता.
3)सांबर पातळ असले तरी चालते फक्त मिठाचे प्रमाण योग्य हवे.
4)घट्ट, दाट करून चपाती भाकरी बरोबर सुद्धा खाता येते.
5)घाईत असताना सर्व पदार्थ (भाज्या, मसाले मीठ)एकदम कुकर मध्ये शिजवावे, व वरून चिंचेचा कोळ, व फोडणी टाकावी.पण शेंगा निखडतात,
6)इडली,डोसा बरोबर सुद्धा हेच सांबार खातात.
7)टोमँटो असताना चिंच न टाकता कोकम चिरून टाकावीत,
8)उन्हळयात कैरी टाकावी, शिजलेल्या फोडी छान लागतात. ( हल्ली वर्षभर मिळतात. )
वर्षा पाटील ©️®️🌹
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा