7)ताकाची कढी.

 साहित्य:-1)  आंबट दह्यात पाणी टाकून  तयार केलेलं ताक, लोणी काढलेलं, ताक,  किंवा विकतच मसाला न घातलेलं ताक,  दोन वाट्या

2) बेसन मोठा 1 चमचा/अगदीच नसेल तर काँर्न पीठ

3)1छोटा चमचा राई

4)1चमचा जीर/जीरपूड

5)5-6कडीपत्याची पाने

6)3-4हिरव्या मिरच्या/1-2लाल सुक्या  मिरच्या

7)1पळी तेल/तूप

8)1छोटा चमचा आलं/लसून पेस्ट

9)1छोटा चमचा हळद

10)1/4चमचा हिंग

11)1 चहाचा चमचा साखर

12)चवीनूसर मीठ

13)1चमचा ताजी बारीक चिरलेली कोंथीबीर

14)1/2बरीक चिरलेला कांदा ऐच्छिक 

15)खोवललं ओल खोबरं

16)2वाटया पाणी

कृती :-प्थम कढईत तेल तापवत ठेवून त्यात राई,टकून ती तडतडली की  जिरं टाकावे, मग मिरच्या टाकाव्यात हवा असलास  बारीक चिरलेला कांदा टाकून  तो पूर्ण  शिजू द्यावा, ताकात हिंग हळद टाकून एकजीव करावे, 1/2 वाटी पाण्यात 1चमचा बेसन टाकून  चांगले एकजीव करावे, गुठळी ठेवू नये.फोडणीत कडीपत्याची पाने, आल, लसूण पेस्ट, टाकून नीट परतले,  की ताक ओतावे, त्यातच बेसन पाणी ओतावे,  बेसन चांगले शिजून द्यावे, बेसन शिरताना कढी घट्टसर  होते, जास्त दाट झाली असल्यास त्यात 1/2-1 वाटी ताक/पाणी टाकून , चवीनुसार  मीठ, साखर, खोबरे, व कोथिंबीर  टाकून उकळी आणावी. कोंथीबीर शिजली पाहीजे. 

भाताबरोबर छान लागते, 


वर्षा पाटील. ©️®️



टिप्पण्या