6)कोकमाची कढी/आमसूलाचे सार

कोकणाची चव ही आंबट प्रकारात मोडते, अन्न पानाचे काम केल्यामुळे चांगले होते, तेव्हा मासांहारी जेवण असेल तेव्हा कोकणाची कढी मुद्दाम करतात. 

साहित्य:-

1)10-12 कोकम, 

2)1मोठा चमचा जीरे, 

3)7-8मीर,

4)1छोटा तुकडा डालचीनी

5 )2-3लवंग

6)3-4 लसून पाकळ्या सोलून, 

7)अगदी छोटा तुकडा आल, 

8)1मोठा चमचा कोंथीबीर  चिरून 

9)1छोटा चमचा राई

10)1वाटी नारळाचे दूध गाळून

11)चवीनूसार मीठ

12)1मोठा चमचा साजूक तूप

13)3-4मिरच्या

14)1/4चमचा हिंग

15)1छोटा चमचा हळद

कृती:-   10-12 कोकम स्वच्छ धुवून उकडून  घ्यावीत, त्याची बारीक पेस्ट करावी, 

मीर,2- 3 लसूण पाकळ्या, आल, जीर,लंवग डालचीनी मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे

. कढई तापत  ठेवून त्यात एक चमचा तूप  टाकून मोहरी टाकून, मोहरी तडतडली की  1-2 लसनाच्या पाकळ्या  ठेचून टाकाव्यात। व सोनेरी रंग होईपर्यंत  परतावा.  अतिशय सुंदर वास येतो.त्यात  हिंग हळद, कोकमाची पेस्ट,  लसूण जीर्याच वाटण, दोन वाट्या  पाणी, 1वाटी नारळाचं दूध, मीठ, कोथिंबीर ,टाकून छान उकळी आणावी.     

टीप:- 1)कढी दाट नको असेल पातळ हवी असेल तर कोकम उघडल्यावर थंड करून त्याच  पाण्यात कुस्करुन ते पाणी गाळून घ्यावे. त्याने आंबटपणा येतो, पण कढी दाट होत नाही.

2)  उकडलेली  कोकम व जिरे,  मीर वाटण एकत्र करून वाटले तरी चालेल,पण पेस्ट बारीक हवी, नाहीतर चरचरीत मसाला  चांगला लागत नाही,  रुपतो.

टिप्पण्या