4)कडधान्याची आमटी

 जशा आपण कडधान्याच्या उसळी बनवतो. तशाच आमटयाही बनवतात. पण सर्वच कडधान्य त्या साठी वापरत नाहीत. ( उदा. छोले, राजमा. पण करायला हरकत नाही )आमटी साठी वापरात येणारी कडधान्य, चणा,(बारीक) वाटाणा, (काळा, पांढरा, हिरवा) चवळी, वाल, मुग मटकी, मसूर इ. 

साहित्य:-

1)2/1पळी तेल.

2) 4-5  मेथी दाणे /कसूरी मेथी

3) 1 छोटा चमचा मोहरी

4)1 छोटा चमचा जीर/जिरपूड

5)1/4हिंग

6)1चमचा हळद

7)1चमचा मसाला

8)1चमचा आल लसुण पेस्ट

9)1चमचा कोंथीबीर 

10) 2 मोठे चमचे वाटलेल सूख खोबरं/ खोवलेला ओल खोबरं

11) लिंबा एवढी  चिंच(1/2वाटी पाण्यात  चिंच भिजवून कोळ करुन शेडी काढून वापरावी. )

12)लिंबा एवढा गुळ

13)5-6 कढीपत्याची  पाने

14) 1 चमचा गरम मसाला 

15)1 मोठा कापलेला /चिरलेला कांदा

16) भाजणीच/तांदळचं पीठ/बेसन

17)1-2मिरच्य तुकडे करून 

18)1 छोटा चमचा ओवा

19)1 छोटा बटाटा/1 टोमँटो/1 शेवग्याची  शेंग सोलून तुकडे  करून/1तुकडा सुरण

20)1 वाटी वरील पैकी कोणतेही कडधान्य

21)चवीनुसार मीठ. 

कृती:-साधारण 12-14तास भिजवलेले वरील पैकी कोणतंही कडधान्य कुकर मध्ये 3 शिट्या देवून पुर्ण  शिजलेले,( अगदी पीठ व्हायला  नको. ) कढईत तेल तापत ठेवून त्यात  मेथी दाणे, मोहरी, जीर तडतडू द्या, नंतर त्यात ओवा कडिपता, आल-लसून पेस्ट ,कांदा परतू द्या.  नंतर हिंग, हळद , मसाला टाका, मग बटाटा व आवडत असतीलं तर वरील सर्व  भाज्या(टमँटो वगळून) टाका 1 ग्लास पाणी टाका, व झाकण देवून शिजू द्या बटाटा  सुरण ,शेंग, शिजले की  शिजलेले कडधान्य व टोमॅटो टाकून ढवळा, मग त्यात 1/2 वाटी पीठ  पाण्यात कालवून, एकजीव करुन  आमटीत टाका, ते चांगल शिजल की,चिंचचा कोळ, गुळ,   खोबरे ,कोंथीबीर व 1छोटा चमचा गरम मसाला वरून कोंथीबीर , (कसूरी मेथी,जीरपूड) , कापलेल्या मिरच्या व चवीपुरतं मीठ  टाका. छान उकळी येवू द्या. 

टीप:1)  मेथी दाणे, 4 -5दाण्यापेक्षा जास्त  टाकू नयेत कारण आमटी कडवट होते. 

2)मेथी दाणे टाकले असतील तर कसूरी मेथी टाकू नये. 

3)आमटीत सुरण असेल तर चींचच वापरायची/ इतर वेळी आंबट चालत नसेल तर कोकम/ अंबोशी/आमचूर पावडर चालते पण आमटी आंबट, तीखट, गोड चवीची व्हायला  हवी. 

4)बेसन पीठ असेल तर ओवा वापरायला हवा. 

5)एवढे सगळे जिन्नस असले की बारीक चिरून मिरची फोडणीत टाकली तरी चालते, 

6)गुळा ऐवजी साखर वापरली तरी हरकत नाही पण गुळांनी जास्त चवदार। होते. 

7)आल,लसून,हिरवी मिरची, कोंथीबीर/(व खोबरं)  वाटण करून टाकले तर वेगवेगळ्या वाटणातील वस्तू टाकायची गरज नाही .पण मग 2-3 लसणाच्या पाकळ्या ठेचून राई बरोबर  फोडणीत टाकाव्यात. 

8)कसूरी मेथी बरोबर ओल्या ऐवजी  दोन सुक्या लाल मिरच्या टाकल्या तर आमटी आणखी खमंग होते.जातीच तिखट चालत असेल तरच टाकाव्यात. 

8)आमटी दाटच चांगली लागते, तेव्हा पाण्याचं प्रमाण योग्य ठेवावं

9)वरील आमटीत शेवग्याची फुलं व शेवग्याची कोवळी पाने  वापरून आमटी करावी, त्यात एखादी शेंग सोडून आणखी काही टाकायची गरज नसते. पाने, फूले व शेंग भरपूर पोषक, व्हिटँमिन  बी12 युक्त आसतात.   

समाप्त. 

वर्षा प्र  पाटील .©️®️🌹







टिप्पण्या