3)उपवासाची शेंगदाण्याची आमटी

संकष्टी  चतुर्थीला दिवसभर निर्जल/निरशन उपवास करून संध्ध्याकाळी /रात्री पुर्ण जेवण करून उपवास सोडतात, परंतु काही उपवास असे असतात की दोन्ही वेळेला जेवायचे नसते/त काही लोकांना उपवास तर करायचा असतो पण काही खाल्या शिवाय राहता येत नाही. अशा वेळेस  वरीतांदूळ व उपवासाची शेंगदाण्याची आमटी खातात. नवरात्र, शिवरात्र, एकादशीला  व काही बायका हरतालिका उपवास आजन्म सोडत नाहीत. अशा स्त्रिया मुद्दाम उपवासची आमटी करतात. 

साहित्य:-
1)भिजवून उकडवलेले शेंगदाणे
2) 1मोठा बटाटा
3)आंबोशी
4)उपवासाची भाजणी 1 वाटी
5)3-4 हिरव्या मिरच्या 
6) 1चमचा जीर
7)वनसपती/साजूक तूप
8)ताज खोवलला नारळ
9)कडीपता
10)कोंथीबीर
11)मीठ

कृती:-कढईत दोन चमचे तूप तापवून त्यात  जीरे, कडिपत्ता कापून तुकडे करून मिरच्या ,शेंगदाणे, बटाट्याच्या  फोडी टाकून त्यात एक ग्लास (पेला) पाणी टाकून झाकण देवून उकळून घ्यावे त्यात 1 वाटी उपवासाची भाजणीचे पीठ हळू हळू पेरावे, व चमच्याने सतत ढवळावे, गुढळी होवू देवू नये. जास्तीचे पाणी टाकून अंबोशी, खोबरे व कोंथीबीर मीठ टाकून  चांगले उकळावे.
टीप:-1)अंबोशी नसेल तर कोकम( आमसूल)2-3टाकावे.
2)अंबोशी /कोकम/ऐवजी ताक वापरावे. 
3)ताकात भाजणी मिसळून एकजीव करून बटाटा शिजल्यावर ओतावे. 
4)कहीजण उपवासाला कोंथीबीर वापरत नाहीत. ऐच्छिक  असावी. 
5) 1,1,चमचा हळद,व मिरची पूड घातली तरी चालेल. 
6)चिंच वैस (मच्छी)असताना करतात, म्हणून  उपवासाच्या आमटीत वापरत नाहीत. 
7)वरईच्या भातावर न खाता नुसतीच खायची असेल तर कोनफळ, मुळ्या सुरण धुवून कुकर मध्ये उकडून त्याच्या  बटाट्याच्या सारख्या फोडी करून, त्या टाक्याव्यात. 
8)सुरण उकडताना कुकर मध्ये कोकम टाकले ,व आमटीत दही टाकले तरी चालते. 
8)उपवसाची भाजणी चविष्ट लागते, पण आयत्या वेळी नसेल तर मक्याचे पीठ बारीक करून तूपात चांगले भाजले व  हवे तेवढे वापरले तरी चालते. शिंगाडे पीठ वापरले तरी चालते, पण (खूप)जस्त लागते. 

समाप्त
वर्षा पाटिल .©®


 

टिप्पण्या