4)टोमॅटोचे सार/5कैरीची कढी

 टोमॅटो, व आंब्याची कैरीची कढीची कृती सारखीच असते. 

साहित्य :-1)प्रथम 4 मोठी लालभडक टोमॅटो घ्यावीत.

2)1 ग्लास पाणी

3)1 चमचा राई

4)1चमचा जीरपूड 

5)1 मोठा चमचा साजूक/वनसपती तूप

6)1/4 लहान चमचा हिंग

7)1लहान चमचा हळद 

8)3-4 मिरच्या

9)1 चमचा आल लसुण पेस्ट 

10 )8-10 कडीपत्याची पाने

11) 1मो

ठा चमचा कोंथीबीर  चिरून

12)1/2वाटी नारळ खोवून/वाटून

13)1 चमचा साखर

14)चवी नुसार मीठ

कृती:-प्रथम टोमॅटो धुवून उकडून गार करून घ्यावेत नंतर त्याची  सुटलेली साले काढून मिक्सरमधून  काढावीत.तयार पेस्ट मध्ये पाणी टाकून एकजीव करावे. कढईत 2 चमचे तुप टाकावे. अनुक्रमे  हिंग, मिरच्या, कडीपत्ता, आल-लसून पेस्ट हळद, जीरेपूड टाकून मग टोमॅटो चा रस टाकून  त्यात नारळाचे वाटण, मीठ ,साखर  टाकावे.  नंतर कोथिंबीर टाकून   चांगली उकळी येवू द्यावी, 

चविष्ट कढी तयार.

टीप:-  1)टोमॅटो उकडल्या नंतर जर त्याची साले काढली नाहीत तर पेस्ट  चरचरीत रहाण्याची शक्यता असते. पाणी व पेस्ट नीट मिक्स न होता. कढी चोथा पाणी होते. 

2)नरळाचे दूध टाकायचे असल्यास टोमॅटो ची संख्या वाढवावी नाहीतर, टोमॅटो चा आंबट चव कढीला न येता नारळाची चव लागते. 

❤❤❤❤❤❤❤🌹🌹🌹🌹🌹❤❤❤❤❤

4)अंब्याची कैरीची कढी,:-दोन कैर्या धुवून ,सोलून, तुकडे करून उकडून (शिजवून)घ्यावे,थड करुन मिक्सर मधून पेस्ट करून 1 मोठा ग्लास पाण्यात  टाकून चांगले  ढवळून एकजीव  करून घ्यावे. पुढील कृती टोमॅटोच्या कढी प्रमाणेच करावी. 

टीप:1)अंब्याच्या करीत फोडणीत मिरची नंतर बारीक चिरून एक कांदा  टाकावा. कांदा जास्त शिजवू नये. कच्चा(क्रचीं)च छान लागतो.  

2)वरील पेस्ट थंड पाण्यात टाकून पन्ह(पेय)करण्यसाठी वापरता येते. 

टिप्पण्या