2)शेंगदाण्याची आमंटी

 शेंगदाण्याची आमटी ही साध्या जेवणात किंवा उपवसाची आमटी सुद्धा करतात. 

साहित्य:-

1)1छोटी वाटी  2 तास भिजत घातलले,शेंगदाणे

2)1 छोटा कांदा

3) 1-२मिरच्या

4)5-6 आमसूल/चिंच(पण्यात भिजवून शेडी व चोथा काढून)

5) 5-6 कडिलिंबाची पानं

6)1चमचा आल लसुण पेस्ट 

7)थोडी कोथींबीर

8)खोवलेलं/वाटलेलं खबर 1 मोठा चमचा

9)1/4 हिंग

10)प्रत्येकी 1चमचा,हळद,मोहरी,जिर,

11)1 चमचा गरम मसाला,1चमचा मिरची पावडर

12)1 मोठा चमचा भाजणीचे पीठ/बेसन/तांदळचं पीठ

13)1छोटा बटाटा धुवून, सोलून बारीक फोडी करून

14)1 शेवग्याची शेंग शेडी काढुन तुकडे करून

15)1टोमँटो धुवून, कापून, तुकडे करून, 

16)मीठ

कृती:-शेंगदाणे 1 शिटी काढून शिजवून घ्या . चिंच अर्धा  पेला पाण्यात खोळून ठेवावी. कढईत तेल तापत ठेवून मोहरी, जीर,मिरच्या,कडिपत्याची पानं, हिंग, हळद,मिरची पावडर ,आल,लसून पेस्ट, कांदा टाकून परतवा, कांदा सोनेरी रंगाचा झाला की, बटाट्याच्या फोडी, शेंगा टाकाव्यात, 1ग्लास पाणी टाकून  त्यावर झाकण ठेवून उकळी आणावी, शेंग व बटाटा शिजल्यावर(ताटात काढून बोटाने दाबून पहावे.त्यात टोमॅटो  टाकावे.)जे पिठ घेतले असेल ते  पिठ पातळसर भिजवावे, व कढईत टाकावे. पिठ शिजल्यावर जाडसर होते, तेव्हा पाणी जरा जास्तच घालावे, पीठ चांगले शिजू द्यावे. नंतर त्यात, गरम मसाला, खोबरं,मीठ, व कोंथीबीर टाकावी. चांगली उकळी आणावी. आतिशय सुंदर वास येतो. चवही छान लागते. खूप जाडसर करू नये. खूप पातळही करू नये .बेचव होते. दाटसर असावी. जोडीला जेवणात भाजी नसली तरी चालते.

टीप:-1)मोहरी, जिर, तडतडली की बाकी सर्व  पदार्थ  पटापट टाकावेत, फोडणी करपू देवू नये.  

2)घाईच्या वेळी शेंगदाणे शिटी न देता घातले तरी चालतात, 

 तसे पण आपण कच्चे खातो. पण शिजलेले जास्त छान लागतात. 

3)टोमँटो घालायचे असेल तेव्हा कोकम वापरावे, व चिंच वगळावे. काही लोक चिंच वापरत नाहीत. त्या साठी, 

4)आमटी जेवढी उकळू तेवढी चविष्ट  लागते. 

5) चिंचेत मीठ कालवलेले असते तेव्हा मीठाचे प्रमाण योग्य टाकावे. 

6)आवडत असेल तर 2 चमचे साखर सुद्धा चालते.  

7)आमटीत गर्दी वाटत असेल तर टोमॅटो  व बटाटा वगळावे. 

8)भाजणीच्या पीठाने जास्त खमंग होते, बेसनने ही चविष्ट  होते. भाकरीच्या पीठाने जास्त  जाड होते, तेव्हा पाण्याचे प्रमाण जितकी दाट हवी तेवढी ठेवावे.

9)थंड झाली की जास्त दाट होते. 

10) आमटीत टोमँटो ,चिंच साखर, 

खोंबर, हे सर्व  जिन्नस शेंग व बटाटा  शिजल्यावरच घालावेत, नाहीतर अर्धवट शिजतात. (शिजत नाहीत. )

वर्षा पाटील©®



 










टिप्पण्या