1)कटाची आमटी

  कटाची आमटी जेव्हा जेव्हा पुरणपोळी  होते, तेव्हा कटाची आमटी होते, साधारण होळी, गौरी, मंगळागौर,पाडवा , नवरात्र ,दसरा, किंवा इतर सण ,काही लोक मुद्दाम  करतात. 

कट म्हणजे, चण्याची डाळ भिजत घालून कुकरमध्ये  शिजवल्यावर डाळीत जे जास्तीच पाणी असतं ते चाळणी खाली भांडे ठेवून चाळणीत शिजवलेली डाळ ओतून भांडयात पडणारे जे पाणी असते त्याला कट म्हणतात. 

साहित्य:-

१) एक 1/4 खोबर्याचा कवडीचा तुकडा

२)1 चमचा हळद ,

3)1 चमचा आलं  लसूण पेस्ट

4)2 हिरव्या मिरच्या आणि 2 लाल सुक्या मिरच्या

5)8-10 कडीपत्याची  पाने

6)1/4चमचा हिंग

7) 1मोठा चमचा चिरलेली कोथींबीर

8)1चमचा जिर

9)1चमचा राई

10)1/2चमचा ओवा

11)5-6 मीरी

12)2 बारीक छोटे कांदे(1 कांदा बारीक चिरून )

13)चवी पुरती साखर

14)चवीपुरतं मीठ

15)1चमचा पुरण

16)साजुक तूप 2 चमचे

कट जर खूपच पातळ झाला  असेल तर त्यात पुरण घालून दाटसर करावे. 

आमटी थोडीच करायची असेल तर कांद्याचे प्रमाण कमी करावे. (1/2,1/2वापरावा)

कृती:-1)प्रथम गॅसवर कांदा भाजून घ्यावा, त्याची करपलेली काळी साले काढून  टाकावीत. 

2)गँसवर/चूलीवर खोबर ठेवावे त्यावर हळद टाकून  ते भाजावे हळदीचा धूर झाला पाहिजे, 

3)5-6मीर,1-2लवंग,1/2तुकडा,डालचीनी, 2 हिरव्या मिरच्या   1 चमचा जीरे ,भाजलेला सूख खोबरं, भाजलेला कांदा बारीक पेस्ट बनवावी(चरट वाटू नये)

4) सर्व वाटण कटात चांगल मिक्स करावं,हळद टाकावी, मीठ, साखर टाकावी. 

5)कढइईत  तुप कडक तापवावे, त्यात, हिंग,  ओवा टाकावा, मग राई तडतडावी कडीपता टाकावा, ,लाल मिरच्या टाकाव्यात, मग आल लसुण पेस्ट टाकून,  अगदी बारीक चिरलेला कांदा टाकावा तो सोनेरी रंग येईपर्यंत  परतावा,नंतर, कट ओतावा, वरून कोथिंबीर  भुरभुरावी. चांगली उकळी येवू द्यावी.

टीप:१)भजलेल्या खोबर्याणचे वाटण काळे होते, तेव्हा खोबरे नुसतेच पातळ काप करून भाजावे, किंवा 1 चमचाभर तेलात त्तळावेत.

२)उपवासाला करायची असेल तर कांदा व आल लसुण पेस्ट टाकू नये. 

3) साखरे ऐवजी गूळ वापरला तरी चालतो. 

4)चणा डाळ पचायला जड असते,  म्हणून ओवा, व हिंग आवर्जून  घालावे.

5)आटवलले साखर घातलेले पुरण टाकले तर जास्त छान लागते, वेगळी साखर/गूळ टाकायची गरज नाही. 

 

वर्मा पाटील. ©️®️🌹





   

टिप्पण्या