साहीत्य:-1) 1वाटी छोले
2)1मोठा बटाटा
3)दोन कांदे चिरून
4)4 टोमॅटो
5)2हिरव्या मिरच्या
6)आल लसून पेस्ट
7)कोंथीबीर
8)ओल खोबर खवणून/वाटून
9)1तेजपत्ता,6-8मीर, 1तुकडा दालचीनी,
10)प्रत्येकी,1चमचा राई, जीरा हिंग,हळद
11)दिड चमचा मसाला(गरम मसाला, छोले मसाला, दोन्ही सेपरेट हवे असतील आणि काबूली चणे पांढरे(चहाची पुरचुंडी टाकू नये.)हवे असतील.
12) ग्रेवी लालभडक हवी असेल तर कमी तिखट पण रंगाला लाल काश्मिरी मिरचीपूडचा एक चमचा.)
13)चवीपुरतं मीठ
14)दोन पळी तेल(पाव वाटी)
15)10-12कडीपत्ताची पाने.
16)1मोठा चमचा क्रिम
17)एक चमचा कसूरी मेथी.(ऐच्छिक)
18)चमचा आमचूर पावडर(ऐच्छिक)
19)चिमुटभर खायचा सोडा.
20)साजूक तूप एक चमचा.
कृती:-
साधारण आपल्याला हवेत तेव्हढे(एक वाटी) छोले रात्री भिजत घालून सकाळी उपसून काढावेत. नंतर ते कुकर मध्ये टाकून त्याच्या दुप्पट पाणी एक चिमुट खायचा सोडा, पाव चमचा मीठ टाकून त्यातच 1 मोठा बटाटा(स्वच्छ धुवून/ सोलून) उकडून घ्यावेत. (ब्राऊन रंग हवा असेल तर दोन चमचे चहा पावडर स्वच्छ मलमलच्या कपड्यात पुरचुंडी धाग्याने बाधून ती त्यात टाकावी.)3शीट्या द्याव्यात. कुकर थंड झाल्यावर त्यातील पुरचुंडी बाजूला काढावी.(छोले बोटाने दाबल्यावर पटकन दाबले पाहीजेत, पण पीठ होता कामा नये.) उकडलेला बटाटा वेगळा ठेवावा.
गॅसवर भांडे तापत ठेवावे. दोन पळी तेल चांगले तापू द्यावे. त्यात राई, जीर टाकून तडतडू द्याव.
10-12कडीपत्ता ची पाने घालावी.
मग कांदा सोनेरी होई पर्यंत परतावा.
आल लसून पेस्ट घालावी.
त्यात, बारीक चिरलेले टोमॅटो टाकावे. ते तेल सुटे पर्यत शिजू द्यावे. त्यात एक छोटा चमचा कसूरी मेथी टाकावी.
तेजपत्ता,दोन हिरव्या मिरच्या उभे काप देवून,मीर,दालचीनी,मोठी इलायची, हिंग, हळद,( गरम मसाला, छोले मसाला, आणि काश्मिरी मिरची पूड)/नेहमीचा मसाला टाकावा.
छोले टाकावेत.सर्व परत परत मिक्स करावे खाली भांड्याला लागू देवू नये.
पुर्ण मिक्स झाले की
खोबरे टाकावे.
कोंथीबीर टाकावी.भाजीत जर ग्रेवी हवी असेल.तर
बटाटा हाताने कुसकुरून भाजीत घालावा.आणि जर ग्रेवी नको असेल तर बटाट्याच्या फोडी घालाव्यात.
आमचूर पावडर भुरभुरावी पूर्ण मिक्स करावे. ताटावर थोड पाणी ठेवून झाकण ठेवावे. दणदणून वाफ द्यावी.
ते पाणी आवश्यकते नूसार भाजीत टाकावे.चवीनूसार मीठ ,(आधी छोले शिजवताना टाकलेले आहे ते लक्षात ठेवून.) आणि क्रीम आणि एक चमचा साजूक तूप घालावे.
परत दोन मिनटे झाकावे.आणि गरम गरम भटूरा, भात, पोळी बरोबर सर्व्ह करावे.
टीप:-
भाजीची काॅन्टीटी कमी जास्त असेल त्या प्रमाणे वरील जीन्नस कमी जास्त करावेत.
समाप्त.
वर्षा पाटील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा